रशियात ती केवळ 14 वर्षांची होती.एका कंपनीच्या कंत्राटावर ती चीनच्या शांघाय शहरात गेली होती.माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,चीनच्या एका मॉडेलिंग एजंसीने तिला करारावर बोलावले होते.तिच्याकडून दिवसरात्र इतके काम करून घेतले की तिला काही खाण्या-पिण्यासाठी देखील वेळ मिळत नव्हता.ती जेव्हा कॅटवॉकसाठी रॅम्पवर उतरली,त्याचवेळी चक्कर येऊन जमीनीवर कोसळली.ती कोमात गेली होती.यानंतर तिचा मृत्यू झाला.
रशियातील पर्म शहरात राहणारी व्लादा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होती.कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने तिने पैसे कमावण्यासाठी मॉडेलिंगची निवड केली.
याचवेली ती चीनच्या एका मॉडेलिंग एजंसीच्या संपर्कात आली.कंपनीने तिच्यासोबत तीन महिन्यांचा करार केला आणि तिला कामानिमित्त शांघायला घेऊन गेले. तिने चिनी कंपनीसोबत करार केल्याची माहिती कुटुंबियांना होती,पण कामाच्या नावाने तिच्याकडून दिवस-रात्र कामे करून घेतली जाणार,तिचे शोषण करणार याची कुटुंबियांना कल्पनाही नव्हती.तिच्याकडून सलग तासंतास काम करून घेतले जात होते.तिला काहीही करण्यासाठी वेळ नव्हता. दररोज 12-13 तास काम करून घेत असल्याने तिची झोपही होत नव्हती.शेवटच्या दिवशी सुद्धा तिच्याकडून खूप काम करून घेण्यात आले होते.तिने रात्रभर जागरण करून प्रॅक्टिस केली आणि दुसऱ्या दिवशी झोप न घेता कॅटवॉकसाठी रॅम्पवर उतरली. रॅम्पवॉक करत असताना ती चक्कर येऊन अचानक जमीनीवर कोसळली.बेशुद्धावस्थेत असलेल्या व्लादा कोमात गेली होती.आठवडाभर कोमात असतानाच आता तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews